बल्लारपूर : सध्या सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. याचे अनेक सदुपयोग आहेत; पण सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला नाही तर फार मोठी डोकेदुखीही ठरू शकते. अशीच घटना चंद्रपूर तालुक्यातील तरुणीसोबत घडली. या तरुणीला उत्तर प्रदेशातील तरुणाशी मैत्री करणं चांगलंच महागात पडले आहे. त्याने तिला ब्लॅकमेल करत व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामवर तिची बदनामी केली. या प्रकारानंतर तरुणीने शनिवारी बल्लारपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सूरजकुमार विजय शंकर याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखलकेला आहे.
चंद्रपूर तालुक्यातील व बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील कल्पना (वय २२) (काल्पनिक नाव) ही तरुणी चंद्रपूर येथील एका महाविद्यालयामध्ये बी.ए. प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंट आहे. या सोशल मीडिया चॅटिंगच्या माध्यमातून तिची ओळख उत्तर प्रदेश येथील एका व्यक्तीसोबत झाली. आरोपी सूरजकुमार विजय शंकर याने १ ते १३ ऑगस्ट दरम्यान सोशल चॅटिंगच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. अशात त्या दोघांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क सुरू केला. व्हिडीओ कॉल करताना अश्लील संभाषण, चित्र व अन्य
बाबीचे दर्शन घडले. याची थोडीही कल्पना त्या तरुणीला न देता, आरोपीने सर्व प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले. एवढेच नव्हे तर ते इतर समाज माध्यमातील मित्रांत व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. बनावट फेसबुक खाते उघडून अश्लील व्हिडीओ व्हायरल केले. अश्लील चॅटिंग व व्हिडीओ कॉल रेकॉर्डचे समाज माध्यमातील व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला वितरण करून चरित्र हनन केले. हा घृणास्पद प्रकार पाहून तिचे अवसान गळाले. या प्रकाराला कंटाळून तिने पोलिस ठाणे गाठले. बल्लारपूर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गाडे करीत आहेत.
चिमूर:-
तालुक्यातील साटगाव ते हिवरा रोडवरील पूल आज पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पूल वाहून गेल्याने बऱ्याच गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर आणखी एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साटगाव वरून हिवरा, वाकर्ला, बोरगाव, मेढा, नक्षी मार्गे भिवापूर जाणारा हा मार्ग असून या मार्गी रोजच वर्दळ असते.दोन वर्षापासून हा पूल जीर्ण अवस्थेत असल्याने या पुलाचे बांधकाम आधी होणे हे फार गरजेचे होते.परंतु बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधीने या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष केले. आता हा पूल पावसाळ्याच्या दिवसात वाहून गेल्याने याला जबाबदार कोण? तसेच पावसाळा सुरू असताना तात्काळ या पुलाचे बांधकाम होणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहे.
पूल वाहून गेल्याची माहिती साटगाव येथील उपसरपंच प्रीती दीडमुठे यांना होताच त्या नागरिकांसह घटनास्थळी पुलावर हजर होऊन पाहणी केली. व याची माहिती संबंधित विभागाला देऊन या पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी केली. व या पुला चे बांधकाम विधानसभा निवडणुकीच्या आत न केल्यास कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मत मागायला गावात येऊ देणार नाही, असा इसारा उपसरपंच व साटगाव हिवरा येथील नागरिकांनी दिला आहे.
चिमूर:-
तालुक्यातील साटगाव ते हिवरा रोडवरील पूल आज पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पूल वाहून गेल्याने बऱ्याच गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर आणखी एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साटगाव वरून हिवरा, वाकर्ला, बोरगाव, मेढा, नक्षी मार्गे भिवापूर जाणारा हा मार्ग असून या मार्गी रोजच वर्दळ असते.दोन वर्षापासून हा पूल जीर्ण अवस्थेत असल्याने या पुलाचे बांधकाम आधी होणे हे फार गरजेचे होते.परंतु बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधीने या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष केले. आता हा पूल पावसाळ्याच्या दिवसात वाहून गेल्याने याला जबाबदार कोण? तसेच पावसाळा सुरू असताना तात्काळ या पुलाचे बांधकाम होणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहे.
पूल वाहून गेल्याची माहिती साटगाव येथील उपसरपंच प्रीती दीडमुठे यांना होताच त्या नागरिकांसह घटनास्थळी पुलावर हजर होऊन पाहणी केली. व याची माहिती संबंधित विभागाला देऊन या पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी केली. व या पुला चे बांधकाम विधानसभा निवडणुकीच्या आत न केल्यास कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मत मागायला गावात येऊ देणार नाही, असा इसारा उपसरपंच व साटगाव हिवरा येथील नागरिकांनी दिला आहे.
चिमूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगरपरिषद चिमूरला निवेदन
चिमूर:-
नगरपरिषदेला जनतेच्या ज्वलंत समस्या अवगत करण्याकरिता आणि त्या तातडीने सोडवून घेण्याकरिता चिमूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्तेसह चिमूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना भेटून जनतेच्या समस्यांविषयी चर्चा-विमर्श करून जनतेच्या समस्या मार्गी लावायच्या होत्या मात्र मुख्याधिकारी हजर नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
तरी नगर परिषदचे सामान्य विभागाचे प्रशासक प्रदीप रनकांब हे हजर होते.त्यांची भेट घेत जनतेच्या समस्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि जनतेच्या समस्या वेळेत सोडविण्याचे सांगण्यात आले व त्यांना निवेदन देण्यात आले
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे,मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख, खासदाराचे स्वीय सहायक राजु चौधरी,युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय नागरिकर,अक्षय लांजेवार,श्रीकांत गेडाम,अमित मोदी,रोहन नन्नावरे,गौरव बोकडे,शुभम निवटे आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
चिमूर:-
तालुक्यातील मौजा मजरा येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वय चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांच्या तर्फे चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे यांच्या हस्ते सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.मजरा येथील विजय मेश्राम वय हे भूमिहीन शेतमजूर व कुटुंब प्रमुख आहेत मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते,वारंवार तब्येत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले,पुढील उपचारासाठी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूरला गेले असता काही महिन्यानंतर पुन्हा त्यांना कॅन्सरचा त्रास सुरु झाला.घरातील प्रमुख व्यक्तीवर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली,त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती डॉ.सतिश वारजुकर यांना दिली असता त्यांना आर्थिक मदत देण्यात आली आर्थिक मदत देताना माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमोद गौरकर,मनोज राने,उपस्थित होते.
चिमूर :-
शहराध्यक्ष रोहन उर्फ (बाबा) भाऊ नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्य वंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित टायगर ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपणान्वये साजरा करण्यात आला.
रोडवरीलबेगर,बेवारस,भिक्षेकरी,निराधार,अनाथ,मनोरुग्ण,पुनर्वसन केंद्र व वृद्धाश्रम इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव,टायगर ग्रुप वर्धा जिल्हा सदस्य सुनील भाऊ मंगरूळकर,टायगर ग्रुप वरोरा तालुकाध्यक्ष ऋषभ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व टायगर ग्रुप चिमूर उपाध्यक्ष विकास जांभुडे,कार्याध्यक्ष विशाल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
प्रमुख उपस्थिती दिव्य वंदना आधार फाउंडेशन अध्यक्ष शुभम दादा पसारकर,शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते,उपस्थित सदस्य विशाल शिवरकर,पवन डोंगरवार,निखिल गिरी,सौरभ चटपकार,प्रफुल मते, कुणाल खिरटकर,शुभम जांभुर्डे स्वप्निल मसराम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
चिमूर:-
स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे विद्यार्थी विकास विभाग, लोकसंख्या विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 11 जुलै ला जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना वाणिज्य विभागांचे प्रा. ड्रॉ. लक्ष्मण कामडी म्हणाले की, जगात भारत हा देश जागतिक लोकसंख्येत क्रमांक एक आहे. भारतात लोकसंख्या वाढल्यामुळे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहे. हया लोकसंख्येला आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी पुढे आले पाहिजे. छोट्या कुटुंबासाठी समाजानी पुढाकार घेतला पाहिजे असे सविस्तर सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ प्रफुल्ल बन्सोड होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, लोकसंख्या वाढली की मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. प्रसार माध्यमांनी लोकसंख्या समस्या विषयी गंभीरपणे जाणीव जागृती करायला हवी आहे. तरुणानी ग्रामीण भागात जाऊन लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सांगितले पाहिजे. कार्यक्रमाला वाणिज्य विभागांचे प्रा. हरेश गजभिये, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पितांबर पिसे,शारिरीक शिक्षा व क्रिडा संचालक डॉ उदय मेंढूलकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. प्रफुल राजुरवाडे प्रा डॉ नितिन कत्रोजवार उपस्थित होते.लोकसंख्या विभागाचे समन्वयक डॉ राजेश्वर रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकसंख्या समस्या विषयी सविस्तर अभ्यासपूर्वक माहिती दिली. सूत्रसंचालन इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख प्रा आशुतोष पोपटे यांनी केले. आभार शारिरीक शिक्षण संचालक डॉ उदय मेंढूलकर यांनी केले.या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक व लोकसंख्या शिक्षण मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते.
चिमूर:-
जिल्ह्यामध्ये
प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोठ्या संख्येत आहेत. ग्रामीण भागात एका-एका प्राथमिक आरोग्य केंद्राला १५ ते २० गावे जोडलेली आहेत. परंतु, त्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी पडत असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांची गैरसोय लक्षात घेता रुग्णालयात रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ तथा समन्व्यक चिमूर विधानसभाक्षेत्राचे डॉ. सतीश वारजूकर यांनी केली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. यादिवसात दूषित पाण्यामुळे तसेच डासांच्या प्रकोपामुळे हिवताप, मलेरिया, - डायरिया, चिकनं गुणिया या सारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य केंद्रे स्वयंपूर्ण असणे आवश्यक असते.परंतु,अनेक रुग्णालयात रिक्तपदे असून,रुग्णांवर तात्काळ उपचार होत
नाही.त्यामुळे रुग्णांची होरपळ होते.अनेकदा उपचाराअभावी रुग्ण दगावण्याच्या घटना घडत असतात. शेतकरी किंवा मजूर शेतीमध्ये काम करत असताना त्यांना विचू, साप तर कधी कधी इंतर विषारी किळे यांच्या दंशाने विषबाधा होण्याची शक्यता असते.अशावेळी रुग्णांवर वेळीच उपचार होणे गरजेचे असते. सद्या स्थितीत पावसाळा सुरु झाला असून अनेक रुग्ण येत असतात परंतु वैधकीय अधिकारी व कर्मचारी अभावी त्यांना एक ते दोन तास वाट पाहावी लागते शेवटी रुग्ण हतबल होऊन प्राव्हेस्ट दवाखान्यात जातात परंतु पैशा अभावी तिथे पण उपचार करणे शक्य नाही,कधी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही. तर कुठे परिचारिका उपस्थित राहत नाही. परिणामी रुग्णांवर उपचार होत नाही. रुग्णांची गैरसोय लक्षात घेता चिमूर विधानसभा क्षेत्रातील तथा जिल्यातील प्राथमिक आरोय केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी डॉ. सतिश वारजूकर यांनी केली
आहे.
खासदार डॉ नामदेव किरसान ला दिले निवेदन
चिमूर:-
एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील कंत्राटी शिक्षकांना व अधिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील काही भाग सोडला तर, सर्वच भाग हा पेसा क्षेत्रातील आहे. नागपूर विभागात एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी स्थानिक भागातील भरलेले होते.पेसा क्षेत्रातील सद्यःस्थितीत सर्वच विभागातील नोकरभरती स्थगित असताना एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील जुन्या कंत्राटी शिक्षकांची व अधिक्षकांची सेवा समाप्त करून याठिकाणी बाहेरील राज्यातील शिक्षकांना व अधिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. ही भरती पेसा नियमांना धरून आहे का, असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे.
जुन्या कंत्राटी शिक्षकांवर व अधिक्षकांनवर अन्याय झाला असून परराज्यातून आलेले अन्य भाषिक शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थानिक भाषेत संवाद साधणार कसा, शिवाय नियुक्त केलेल्या शिक्षकांची भरती प्रक्रियावर साशंकता आहे.
अनेक वर्षांपासून परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे व अधिक्षकाचे भवितव्य अंधारात आले असून त्यांचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे.अनेकांचे नोकरीला लागण्याचे वय देखील संपले आहे.एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील कत्राटी शिक्षकांच्या व अधिक्षकाच्या नियुक्तीबद्दल गांभीर्याने विचार करून जुन्याच स्थानिक शिक्षकांना व अधिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे,अशी मागणी समाज कार्य पदविधर कल्याण मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष अक्षय लांजेवार यांनी खासदार डॉ नामदेव किरसान यांना निवेदनातून करण्यात आले आहे.
चिमूर :-
सन २०२२ मध्ये खतांच्या गटाराचे पाणी टाकिच्या प्रवाहातुन माकोना गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळच्या माध्यमातून गेले आणि त्यामुळे माकोना गावातील अनेक मुले – मुली,लाहनशे बाळ,मोठे माणूस रोगाने आजारी झाले होते.
या गंभीर घटनाक्रमाला अनुसरून पुढाकार घेत जगदिश मेश्राम भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष यांनी आंदोलन करुन स्वच्छ परीसर करण्यास भाग पाडले होते.
आता नळ योजना द्वारे पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दुषित येत असल्याने पुन्हा नागरिक आजारी पडतांना दिसुन येत आहेत.लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की आरो फिल्टर बसणार.यानुसार भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी पाठपुरावा करून आरो मंजुर केला होता.
मात्र ठेक्याचा अभावी आरो बसवण्यात आला नाही.त्यामुळे आता भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम हे पंचायत समिती चिमुरचे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी हे माकोना वासियांच्या आरोग्य सुरक्षेकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे माहीती त्यांनी दिली आहे.
माकोना गावात बंद पडलेला आरो भंगार मध्ये विकण्याची परवानगी संरपंच्यांनी द्यावी अशी सुध्दा मागणी केली आहे.
चिमूर:-
तालुक्यातील पिंपळनेरी येथील अर्धवट राहिलेल्या बुद्धविहाराचे काम पूर्ण करण्यासाठी डॉ.सतीश वारजूकर यांनी 21000 रुपयाची तात्काळ आर्थिक मदत दिली त्यामुळे बौद्ध पंच कमिटीने त्यांचे मनपूर्वक स्वागत केलेले आहे
चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील बौद्ध समाज बांधवांनी स्वखर्चातून बौद्धविहाराचे बांधकाम करण्याचे ठरविले होते त्यांनंतर संपूर्ण समाज बांधवांनी बौद्धविहारच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली जमलेल्या वर्गणीतून बांधामांला सुरुवात करण्यात आली गोळा केलेल्या निधीतून बांधकाम स्लॅब लेवल पर्यंत गेले परंतु पुढे काम करन्यासाठी त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्याने काम पूर्ण कसे करायचे हा प्रश्न गावकऱ्यासमोर निर्माण झाला याच वेळी गाव समस्या एकूण घेण्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर हे पिंपळनेरी येथे गेले होते त्यावेळी बौद्ध विहार बांधकामाची पाहणी केली गावकऱ्यांनी आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी स्वनिधीतून त्यांना 21 हजार रुपयाची आर्थिक मदत केली व बांधकाम पूर्ण करण्याचे सांगितले उपस्थित समाज बांधवांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विवेक कापसे, चिमूर शहरअध्यक्ष अविनाश अगडे,उपस्थित होते
चिमूर:-
चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्रात अनेक बाबी प्रलंबीत आहेत यात सिंचन, रेल्वे, रस्ते, घरकुल योजना विहीर, या कामाना प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील. जी कामे प्रलंबीत आहेत ती कामे पूर्ण करण्यासाठी प्रर्यत्नशिल आहे. शासकिय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीका पर्यंत पोहचला पाहीजे, सिंचन तथा पिन्याच्या पान्याची समस्सा मोठ्या प्रमाणात आहे. मनरेगा कामाचे मजुरांचे पैसे लवकर मिळाले पाहीजे, घरकुलाचा लाभ गरजुना मिळाला पाहीजे, शेतीसाठी मार्गदर्शन कृषी विभागाने करणे गरजेचे आहे. अधिकारी मोगमपणे माहीती सांगतात ती प्रत्यक्ष तपासली जाईल, अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना खासदार नामदेव किरसान यांनी दिल्या. ते चिमूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
चिमुर - वरोरा नॅशनल हायवे चे काम अपूर्ण का ? यावर नॅशनल हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन प्रश्न सोडविन्यात येईल. सरडपार गावचा प्रश्नावर उत्तर देताना शासन आणि प्रशाशनाची झालेली चूक त्यांनी वेळीच दुरुस्त करायला हवी होती. मात्र दप्तर दिरंगाईने सरडपार वासीयांना यातना भोगाव्या लागत आहेत हि बाब प्रशासनाकडे लाऊन धरणार, मुरपार येथील कोळसा खान का बंद पडली यावर सविस्तर बाबी तपासून घ्यावे लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सतीश वारजुरकर सरडपार गावाच्या प्रश्नावर तसेच इंदिरा नगरच्या समस्सेवर स्थानीक लोकप्रतीनिधीवर टिका करीत कोणतीही समस्या सोडविन्यासाठी एका वर्षेच्या कालावधीत सोडविता येतात मात्र मनात नसले तर अनेक वर्षे लागतात सिमेन्ट रस्ते, सभागृह म्हणजे विकास होय काय ? असा प्रतीप्रश्न उपस्थीत करून सरडपार गावाला आठ वर्षांत कोणत्याच ग्राम पंचायतमध्ये सामावून घेतले नाही. कारण तिथे दलीत आदिवासी बांधव रहातात म्हणून दप्तर दिरंगाई चालू असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. अविनाश वाजुरकर, विजय गावंडे तालुका अध्यक्ष चिमुर, माधव बिरजे, गजानन बुटके, अविनाश अगडे, प्रशान्त कोल्हे, प्रा राम राऊत, पप्पु शेख, विवेक कापसे सह काँग्रेस पदाधीकारी उपस्थित होते.
चिमूर:-
जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. लोकशाहीच्या मार्गाने गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील मुलभूत समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार आहे.अशी ग्वाही खा. डॉ.नामदेव किरसान यांनी चिमूर येथील पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर प्रथमच ते चिमूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गत 10 वर्षात लोकसभा क्षेत्रात एकही विकासकामे झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजप सरकारवर प्रचंड नाराजी आहे. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने जाती-जातींमध्ये वैमनस्य निर्माण करून आपली राजकीय पोळी
शेकण्याचा प्रयत्न केला.शासनाच्या योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असताना सिंचनाची फारशी सुविधा मिळाली नाही. परिणामी चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा खनिज खनिकर्म अध्यक्ष डॉ अविनाश जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके तालुकाध्यक्ष डॉ विजय गावंडे प्रदेश संघटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग धनराज मुंगले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष माधव बिरजे अविनाश अगडे.प्रा राम राऊत नवनियुक्त स्वीय सहाय्यक राजेश चौधरी आदी काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील रहिवासी असणारे श्री विलास मंगरू शिवरकर ह्यांचा पाय फॅक्चर झाला, उपचार सुरु आहे,परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्याने खर्च झेपत नसल्याने हतबल झाले होऊन कुटुंबीयांनी गावातील भाजपा पदाधिकारी मार्फत चिमूर विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कडे आर्थिक मदती करीता हाक दिली असता. हाकेला त्वरित प्रतिसाद देत आमदार साहेबांनी लगेच तालुकाध्यक्ष तथा शंकरपूर सर्कल निरीक्षक श्री राजू पाटील झाडे, जि. प. शंकरपूर सर्कल प्र. श्री अविभाऊ बारोकर, श.के. प्रमुख श्री नारायणभाऊ चौधरी, बु.अ. श्री अरविंद येळणे, भाजपा कार्यकर्ता रमेश कंचर्लावार, श्री कनूभाऊ बघेल यांना पाठवून घरपोच आर्थिक मदत दिली.
माजी जि.प.अध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर यांची मागणी…
चिमूर:-
जिल्हा परिषद शाळेचे नविन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी १ ते ४ तर काही ठिकाणी १ ते ७ पर्यंत वर्ग असलेल्या जि.प.शाळा आहेत.
परंतु या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन त्यांच्या बौध्दीक क्षमतेवर परिणाम होत आहे.
त्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी डॉ. सतिश वारजूकर यांनी केलेली आहे.
प्रत्येक गावात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावा यासाठी सरकारणे गावा-गावात जिल्हा परिषद शाळेची निर्मीती केलेली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडावे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावू नये विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यात यावे भावी पिढीला ज्ञान मिळावे हे सर्व उद्देश ठेवून या शाळांची निर्मीती झालेली आहे.
परंतु प्रत्येक शाळेत शिक्षकांची आज कमतरता जाणवत आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग १ ते ४ वर्गापर्यंतच्या शाळेत एक किंवा दोनच शिक्षक आहेत.
तर ज्या गावात १ ते ७ वर्ग आहेत त्या शाळेवर दोन ते तिन शिक्षक आहेत.या १ ते ४ पर्यंतचा वर्गासाठी मात्र काही ठिकाणी एक शिक्षक तर काही ठिकाणी दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केल्या जावू शकत नाही.
जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकवण्यापेक्षा ईतर कामांचे ओझे जास्त पडू लागले आहे जनगणना,निवडणूकीचे कामे शिक्षकांकडून करून घेतली जात आहेत तसेच मतदार पुनर्निरीक्षण,बिएलओ या कामांचाही तान शिक्षकांवर दिल्या जात आहे.त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या होत आहे एका शिक्षकावर वर्ग १ ते ४ शिकविण्याची वेळ आलेली आहे.
त्यामूळे विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक ज्ञान मिळत नाही त्यामूळे जि.प. शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. शिक्षण विभागाने केवळ शिक्षण व अध्यापनावर लक्ष केंदित केले आणी इतर कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळेल व त्यांची बौध्दीक क्षमता वाढण्यास मदत होईल त्यासाठी अशा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी डॉ. सतिश वारजूकर यांनी केलेली आहे.
Chandrapur News : वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना आता चपराक बसणार असून, शासनाची याकडे करडी नजर आहे. मागील वर्षी अशाच एका प्रकरणात मुलाला चपराक बसली आहे. मूल तालुक्यातील राजोली येथील भास्कर दामोधर ठिकरे यांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिल्यानंतर
उपविभागीय अधिकारी मूल यांच्याकडे 17 नोव्हेंबर 2022 रोजी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुलाला दरमहा 3 हजार रुपये देण्याचा आदेश 25 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिला होता.
यावरून आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना आता शासनाची चपराक बसणार आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आई वडील आणि ज्येष्ठ पालक तथा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 चे कलम 5 अन्वये आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या उपजीविकेसाठी दरमहा रक्कम त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बघून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आई-वडील आणि ज्येष्ठ पालक तथा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 चे कलम 5 अन्वये जी मुले आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी नकार देतात, अशा व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्याकडे तक्रार द्यावी.
चिमूर:-
दि.२/६/२४ नागपूर येथे इंडियन स्केटिंग अकॅडमीच्या वतीने
स्केटरेसर्स इंडिया ओपन रोलर स्केटिंग चैपीयनशीप NMC स्केटिंग रिंक नंदनवन नागपूर येथे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्केटिंग स्पर्धेत नागपूर, उमरेड, चिमूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, अचलपूर, संभाजीनगर, नाशिक येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत चिमूरच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत ३ पदके पटकावलीत. त्यात २ रौप्य पदक व १ कास्यपदकांचा समावेश आहे.
8 ते 10 वयोगटातील हृदयांश उमेश काटेकर याने रौप्यं पदक पटकाविले. तसेच १४ वर्षवरील वयोगटातील स्वर्णीका श्रीकांत मार्गोनवार हिने रौप्य पदक पटकाविले. 6 - 8 वयोगटातील पीहल प्रशांत सूर्यवंशी हिने कास्यं पदकं पटकाविले.
10 ते 12 वयोगटातील अनुष श्रीकांत मार्गोनवार व ४-६ वयोगटातील रिध्दीशा उमेश काटेकर यांनी छान प्रयत्न केलेत. सर्व विजेते स्केटर्स चिमूर स्केटिंग अकॅडमी चिमूर चे नियमित खेळाडू आहेत. सर्व खेळाडू आपल्या सफलतेच श्रेय आपल्या आई-वडिलांना तसेच कोच सौ रोशनी उमेश काटेकर यांना देत आहेत. स्केटिंग अकॅडमी चिमूर चे व सर्व विजयी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे सर्व पालकांकडून तसेच चिमूरवासीयांकडून अभिनंदन केल्या जात आहेत.
चिमूर:-
विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे. याकरीता लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड व मोबाईल नंबर तहसिल कार्यालय, चिमूर येथील संजय गांधी योजना शाखेत जमा करावे. असे आवाहन तहसिल कार्यालयाद्वारे करण्यात आले होते.
ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड व मोबाईल नंबर तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात सादर केले नाही. त्यांनी तात्काळ वरील कागदपत्रे संजय गांधी योजना शाखेत तहसिल कार्यालय,चिमूर येथे सादर करावे.तसेच चिमूर तालुक्यातील सर्व निराधार योजनेतील लाभ घेणाऱ्या लाभार्थी यांना कळविण्यात येते की, सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट, 2019 नुसार शासनाकडून देण्यात येत असलेल्या निराधार योजनेतील लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला घेण्याबाबतचे निर्देश आहे.
त्या अनुषंगाने राज्य शासन पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांनी नोंद घेवून उपरोक्त प्रमाणे (मा. तहसिलदार यांचे डिजिटल स्वाक्षरीचे) ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला माहे जुन, 2024 पर्यंत संजय गांधी योजना शाखेत तहसिल कार्यालय, चिमूर येथे सादर करावे असे पत्रकातून कळविण्यात आले आहे
चिमूर:-
उन्हाळा सुरु असून चिमूर तालुक्यात अनेक दिवसापासून रात्र दिवस खंडित विज पुरवठा होत असल्यामुळे तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवलेली असून त्याना पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्यामूळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहे.
तसेच लहान मुले व जनतेला उष्णतेच्या लाटेमुळे राहणे कठीन झाले आहे. लहान मुले झोपू शकत नाही. तसेच वयोवृद्ध लोकांच्या प्रकृतीवर परीणाम पडत आहे. रात्रीच्या वेळेसही विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे जनतेला फारच त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर शहरात दिवसभरात दहा वेळा लाईट जात असते.
कृपया चिमूर तालुक्यात ४ ते ५ दिवसापासून रात्रंदिवस होत असलेल्या खंडीत विज पुरवठ्यावर तात्काळ उपाय योजना करावी असे निवेदन राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला.
यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जेष्ठ नेते विवेक कापसे, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस रोशन ढोक, तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, माजी उपसभापती शांताराम सेलवटकर, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सविता चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, मोहिनकर ताई,माजी उपसभापती स्वप्नील मालके, सरपंच रामदास चौधरी, सरपंच भोजराज कामडी, सुधीर जुमडे, लटारू सूर्यवंशी, सुभाष करारे, रुपचंद शास्त्रकर,विलास मोहिनकर, पांडुरंग डोये,प्रमोद धाबेकर,मनोज खेटमाली,स्नेहल शंभरकर, श्रीकांत गेडाम व काँग्रेस पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
चिमूर
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील रहिवासी रिया प्रदीप गारघाटे हिने प्रकृतीच्या कारणास्तव सहा महिने कॉलेजला न जाता नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत कठीण परिस्थितीमध्ये जीकरीने अभ्यास करून सायन्स मध्ये 87% गुण मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तिचे वर सर्वच स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
रिया ही मागील सत्रात नागपूर येथील संत पाल ज्युनियर कॉलेज मध्ये बारावी सायन्स मध्ये शिकत असताना तिची प्रकृती अचानक पणे बिघडली. त्यामुळे तिला नागपूर येथीलच दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. तिचे दिनांक 5 मे 2023 ला किडनीचे मेजर सर्जरी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सहा महिने कम्प्लीट बेड रेस्ट म्हणून घरीच ठेवण्यात आले. परंतु तिने अशाही कठीण परिस्थितीमध्ये हार न मानता वडिलांच्या मार्गदर्शनात घरीच अथक परिश्रम घेऊन बारावीचा अभ्यास सुरू केला. आणि सहा महिने घरीच अभ्यास करून बारावीची परीक्षा दिली.
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालामध्ये अशाही अवघड परिस्थितीमध्ये तिला 87% गुण मिळाल्याने तिचेवर प्राध्यापक वर्गाकडून तसेच गावातील नागरिकाकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
तिने केलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाल्याने वडील प्रदीप गारघाटे यांनी तिच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.